Tuesday, February 16, 2010

रंगदक्षिणी - २०१०

महाराष्ट्र मंडळ, बंगळूर तर्फे घेण्यात येणारी 'महाबँक रंगदक्षिणी मराठी एकांकिका स्पर्धा' ह्या वर्षी दिनांक २४, २५, २६ जानेवारी २०१० रोजी पार पडली. आपल्या मराठी मंडळातर्फे 'स्क्वेअर वन' ही एकांकिका सादर करण्यात आली.

स्क्वेअर वन


लेखक - कश्यप देशपांडे

दिग्दर्शक - अनुप सूर्यवंशी

कलाकार - पुष्कराज जोशी, समीहन जोशी, हर्षवर्धन पाठक, शंतनु भट

नेपथ्य - स्वाती देशपांडे, नागराज स्वामी, ऋषिकेश कुलकर्णी, भरत जोशी, अभय, हृषिकेश

ध्वनी - सिद्धार्थ खरे

प्रकाशयोजना - अमृत जोशी, पल्लवी काकडे

विशेष सहाय्य - विशाल दीक्षित,जान्हवी जोशी,अनिरुद्ध डंबल,मधुमिता भारदे,निखिल कात्रे,रवी शेट्ये,शशांक साठ्ये

भरघोस प्रतिसाद - सर्व उपस्थित "आय्.आय्.एस्.सी. मराठी परिवार"

Saturday, January 2, 2010

दीपावली शुभेच्छापत्रे आणि पुस्तकखुणा (Greetings and Bookmarks)

बेंगळूरुमधील ज्येष्ठ कार्यकर्त्या लीलावती भगवंत आणि त्यांच्या कन्या सौ सविता शास्त्री गेली अनेक वर्षे हा उपक्रम राबवीत आहेत. त्यांनी स्वतः तयार केलेल्या शुभेच्छापत्रे आणि पुस्तकखुणांच्या विक्रीमधून उभा राहणारा सर्व निधी हा वर्धा येथे बाबा आमटे यांच्या आनंदवनाला पाठवण्यात येतो. आपल्या कलेच्या जोपासनेमधूनच केलेल्या समजकार्याच्या त्यांच्या या अभिनव संकल्पनेसाठी मराठी मंडळही आपला खारीचा वाटा उचलते.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंडळातर्फे दिवाळीच्या शुभेच्छापत्रे आणि पुस्तकखुणांची विक्री करण्यात आली. १० आणि ११ ऑक्टोबर २००९ ला IISc मधील A, B व C मेस समोर मांडलेल्या स्टॉलना उदंड प्रतिसाद लाभला.

यावर्षी एकूण १२ वेगवेगळ्या प्रकारची शुभेच्छापत्रे आणि ५ प्रकारच्या पुस्तकखुणा विक्रीस होत्या. तीनही स्टॉलवर विक्रीस असलेल्या जवळजवळ सर्व गोष्टी २ दिवसात विकल्या गेल्या. छोट्या आकाराच्या पुस्तकखुणांना या वेळी सर्वात जास्त पसंती लाभली.

हा सर्व निधी सौ सविता शास्त्री ह्याच्या हाती सुपूर्त करण्यात आला. त्यानंतर साधारण महिन्याभरात कौस्तुभ आमटे ह्यांच्याकडून निधी पोहोचल्याची पोचपावती स्वरूपी पत्रही मंडळास मिळाले.

Sunday, October 4, 2009

कोजागरी पौर्णिमा - २००९.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मराठी मंडळा तर्फे 'कोजागरी पौर्णिमे'चा कार्यक्रम करण्यात आला.कार्यक्रमाची सुरवात गणेश-पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर मकरंद पाटील याने कोजागरीचे महत्व सांगितले. प्रत्येकात दडलेल्या कवी-मनाचा शोध घेणारा मजेशीर खेळ खेळला गेला.पाच गटांना प्रत्येकी तीन शब्द देण्यात आले.त्या शब्दातून अर्थपूर्ण, मजेशीर कविता साकारायची होती.त्यानंतर प्रत्येक संघापुढे बादलीतील पाणी ओंजळींतून पुढे नेउन कमीत कमी वेळात रिकामी बाटली भरण्याचे अव्हान ठेवण्यात आले.


या मजेशीर खेळांनंतर कार्यक्रमाने कलाटणी घेतली. 'नेत्रदाना' विषयी आजही समाजात अज्ञान आणि गैरसमज आहेत. नाईक काका आणि काकूंनी आपल्या नेत्रपेढीतील कामाच्या अनुभवांचे छोट्या नाटिकेतील रुपांतर सर्वांसमोर सादर केले.या प्रबोधनपर नाटिकेमुळे कार्यक्रम हा फ़क़्त मजेचा न राहता नेत्रदानाचा संदेश देणाराही ठरला. यानंतर स्वादिष्ट मसालेदूध आणि चटकदार अल्पोपहाराच्या आस्वादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Wednesday, September 30, 2009

कोजागरीसाठी आपणां सर्वांना आग्रहाचे निमंत्रण !!!!


आपल्या परंपरेप्रमाणे आपण ह्यावर्षीही अश्विन पौर्णिमा किंवा कोजागरी पौर्णिमा साजरी करत आहोत. ह्या रात्री सगळे एकत्र जमून चंद्राच्या अमृतकिरणांच्या वर्षावात जल्लोष करुयात.
यासाठी तुम्हा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण !!!!

लोभ आहेच, तो वृद्धिंगत होवो.

आपलेच ,
मराठी मंडळ