Home/स्वगृह



मराठी मंडळाबद्दल थोडेसे...

नमस्कार,

भारतीय विज्ञान संस्थेच्या मराठी मंडळात आपल्या सर्वांचे स्वागत आहे. १९६४ साली स्थापन झालेले हे मराठी मंडळ गेले अनेक वर्ष अव्याहतपणे कार्यरत आहे. मंडळाची सुरुवात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी म्हणून जरी झाली असली, तरी त्यानंतर त्यात इतरही अनेक उपक्रमांची भर पडत गेली. आपल्या मातीपासून दूर आलेल्या विद्यार्थ्यांना आपले सण, उत्सव साजरे करता यावेत तसेच सर्वांना एकत्र येण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे यासाठी मराठी मंडळ काम करते.

वर्षभरात मराठी मंडळ करत असलेल्या उपक्रमांची माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी मारा.

Activities/उपक्रम

गेल्या काही कार्यक्रमांची माहिती/वृत्तांत तसेच आगामी कोणते कार्यक्रम आहेत हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी मारा.

आगामी कार्यक्रम आणि वृत्तांत

आपण भारतीय विज्ञान संस्थेच्या बाहेर राहता, महाराष्ट्राबाहेर इतर कोणत्या शहरात राहता? तिथे असलेल्या महाराष्ट्र मंडळाची वेबसाईट पाहायची आहे? खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी मारून पहा.

महाराष्ट्र मंडळे

मंडळाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची अधिक माहिती, सूचना पाहिजे असल्यास कार्यकारी मंडळाशी संपर्क साधावा. या वर्षीचे कार्यकारी मंडळ खाली दिलेल्या दुव्यावर पाहता येईल.

कार्यकारी मंडळ


मराठी मंडळाचे सदस्यत्व कसे घ्यावे? कोणाला घेता येईल?

मराठी संस्कृतीची आवड असणाऱ्या कोणालाही मंडळाचे सदस्य होता येते. त्यासाठी मातृभाषेचे बंधन नाही. यापूर्वीही अनेक अमराठी सदस्य मराठी मंडळाला लाभले आहेत. त्यांनी उत्साहाने मंडळाच्या कार्यक्रमात आणि सण साजरे करण्यात भाग घेतला आहे. तसेच अनेक माजी विद्यार्थी सुद्धा मंडळाचे सदस्य आहेत.

सदस्यत्व घेण्यासाठी वार्षिक शुल्क हे चालू वर्षाच्या समितीकडे सुपूर्त करावे व आठवणीने पावती घ्यावी. शुल्काबाबत अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा कोषाध्यक्ष यांच्याशी संपर्क साधावा.

वर्ष २०१४-१५ साठी वार्षिक शुल्क खालील प्रमाणे - 

विद्यार्थ्यांसाठी: रु.३५०/-
माजी विद्यार्थ्यांसाठी:  रु.७००/-

याशिवाय कुठल्या कार्यक्रमाला आपल्या सोबत पाहुणे असल्यास त्यांनाही घेऊन येऊ शकता, फक्त त्यापूर्वी त्या कार्यक्रमाचे अतिथी शुल्क भरावे. प्रत्येक कार्यक्रमाचे अतिथी शुल्क वेगवेगळे असल्यामुळे त्या त्या वेळी ते सांगण्यात येईल, अथवा अध्यक्षांशी संपर्क साधावा.

अध्यक्ष (मराठी मंडळ) यांचा इमेल आयडी: iiscmarathimandal@gmail.com

No comments:

Post a Comment