Saturday, January 2, 2010

दीपावली शुभेच्छापत्रे आणि पुस्तकखुणा (Greetings and Bookmarks)

बेंगळूरुमधील ज्येष्ठ कार्यकर्त्या लीलावती भगवंत आणि त्यांच्या कन्या सौ सविता शास्त्री गेली अनेक वर्षे हा उपक्रम राबवीत आहेत. त्यांनी स्वतः तयार केलेल्या शुभेच्छापत्रे आणि पुस्तकखुणांच्या विक्रीमधून उभा राहणारा सर्व निधी हा वर्धा येथे बाबा आमटे यांच्या आनंदवनाला पाठवण्यात येतो. आपल्या कलेच्या जोपासनेमधूनच केलेल्या समजकार्याच्या त्यांच्या या अभिनव संकल्पनेसाठी मराठी मंडळही आपला खारीचा वाटा उचलते.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंडळातर्फे दिवाळीच्या शुभेच्छापत्रे आणि पुस्तकखुणांची विक्री करण्यात आली. १० आणि ११ ऑक्टोबर २००९ ला IISc मधील A, B व C मेस समोर मांडलेल्या स्टॉलना उदंड प्रतिसाद लाभला.

यावर्षी एकूण १२ वेगवेगळ्या प्रकारची शुभेच्छापत्रे आणि ५ प्रकारच्या पुस्तकखुणा विक्रीस होत्या. तीनही स्टॉलवर विक्रीस असलेल्या जवळजवळ सर्व गोष्टी २ दिवसात विकल्या गेल्या. छोट्या आकाराच्या पुस्तकखुणांना या वेळी सर्वात जास्त पसंती लाभली.

हा सर्व निधी सौ सविता शास्त्री ह्याच्या हाती सुपूर्त करण्यात आला. त्यानंतर साधारण महिन्याभरात कौस्तुभ आमटे ह्यांच्याकडून निधी पोहोचल्याची पोचपावती स्वरूपी पत्रही मंडळास मिळाले.