दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मराठी मंडळा तर्फे 'कोजागरी पौर्णिमे'चा कार्यक्रम करण्यात आला.कार्यक्रमाची सुरवात गणेश-पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर मकरंद पाटील याने कोजागरीचे महत्व सांगितले. प्रत्येकात दडलेल्या कवी-मनाचा शोध घेणारा मजेशीर खेळ खेळला गेला.पाच गटांना प्रत्येकी तीन शब्द देण्यात आले.त्या शब्दातून अर्थपूर्ण, मजेशीर कविता साकारायची होती.त्यानंतर प्रत्येक संघापुढे बादलीतील पाणी ओंजळींतून पुढे नेउन कमीत कमी वेळात रिकामी बाटली भरण्याचे अव्हान ठेवण्यात आले.
या मजेशीर खेळांनंतर कार्यक्रमाने कलाटणी घेतली. 'नेत्रदाना' विषयी आजही समाजात अज्ञान आणि गैरसमज आहेत. नाईक काका आणि काकूंनी आपल्या नेत्रपेढीतील कामाच्या अनुभवांचे छोट्या नाटिकेतील रुपांतर सर्वांसमोर सादर केले.या प्रबोधनपर नाटिकेमुळे कार्यक्रम हा फ़क़्त मजेचा न राहता नेत्रदानाचा संदेश देणाराही ठरला. यानंतर स्वादिष्ट मसालेदूध आणि चटकदार अल्पोपहाराच्या आस्वादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

लोकहो..
ReplyDeleteएकूणच कार्यक्रम मनात घर करून गेला !!!
हा कार्यक्रम यशस्वी करण्यात हातभार लावलेल्या सर्वांचे मन:पुर्वक अभिनंदन !!!