Wednesday, September 16, 2015

निमंत्रण: गणेशोत्सव-२०१५

नमस्कार मंडळी,

            गणेश चतुर्थी अवघ्या एका दिवसावर आली आहे. मंडळाची तयारी अगदी जोशात सुरु असून अंतिम टप्प्यात आलीये. दरवर्षीप्रमाणे या वेळीही आपला मोठा  प्रतिसाद लाभणार याची आम्हाला खात्री आहेच . तरी कार्यक्रमाची निमंत्रण-पत्रिका ई-मेलद्वारे पाठवीत आहे.
कार्यक्रमाचा तपशील हा खालील प्रमाणे आहे:
१७ सप्टेंबर:
'श्रीं'ची प्रतिष्ठापना आणि  अथर्वशीर्ष पाठ - सकाळी ८ वाजता 
आरती  - सायं. ७ वाजता
१८ सप्टेंबर:
आरती - सकाळी ८.३० वाजता ( कॅरम हॉल )
विसर्जन मिरवणूक - दु. १ वाजता ( कॅरम हॉल )
सांस्कृतिक कार्यक्रम व सहभोजन - सायंकाळी ६ वाजता (SAC ) 




          
धन्यवाद !

Thursday, March 19, 2015

गुढीपाडवा

नमस्कार,

फाल्गुन संपून चैत्र उजाडायला फक्त दोन दिवस उरले आहेत. हिंदू नववर्षाचे स्वागत करायला सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली असेलच. म्हणून येत्या शनिवारी,  २१ मार्च २०१५ (चैत्र शु. १ प्रतिपदा, शके, १९३७) रोजी, नवीन वर्षाची गुढी, मराठी साम्राज्याचा विजय-ध्वज उभारण्यास आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे अशी नम्र विनंती.
गुढी उभारण्याचा कार्यक्रम जिमखाना येथे, सकाळी ०८:०० वाजता, आयोजित करण्यात आला आहे.

याच बरोबर, दरवर्षी प्रमाणे आपल्यासाठी मराठी चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. त्याचे ठिकाण आणि वेळ खालील प्रमाणे आहे  -
ठिकाण : CES Seminar Hall, 3rd floor, Biological Sciences.
दिनांक  : २२/०३/२०१५ (रविवार)
वेळ      : दुपारी ३.०० वाजता.
चित्रपटाचे नाव आपणास सुखद धक्का देण्यासाठी गुपित ठेवण्यात आले आहे !
धन्यवाद

Monday, October 20, 2014

दीपोत्सव २०१४

सस्नेह निमंत्रण,

मंगल स्नान आणि मंगल स्वर ।
आली पहाट दीप घेउन धरतीवर ।
खमंग फराळ आणि पहाटेचा गारवा ।
मिळून सारे लुटुया दीपावलीचा गोडवा ।।

सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !

हा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण मराठी मंडळातर्फे २३/१०/२०१४ रोजी "दीपोत्सव" आयोजित करत आहोत . पहाटे पहाटे सर्वांनी एकत्र येऊन हा दीव्यांचा सण पणत्या लाऊन साजरा करुया. कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी रांगोळी आणि आकाश कंदिल तर आहेतच पण त्याच बरोबर दिवाळीचा फराळ आपली वाट बघत आहे ! 

आपली उपस्थिती आमच्यासाठी अमूल्य आहे.


वेळ: २३/१०/२०१४, पहाटे ५ (5 am)

स्थळ : जिमखाना गच्ची, पहिला मजला ( Near Carom Hall )



Sunday, September 14, 2014

नवीन कार्यकारिणी समिती (2014 - 15)

नमस्कार ,
गेल्या वर्षभरात लाभलेली तुमची साथ आणि सहभाग ह्यामुळेच मंडळाचे कार्यक्रम आपण पार पाडू शकलो .
ह्यापुढेही मंडळावरील लोभ वृद्धिंगत होउदे.

२०१४-१५ सालासाठीची कार्यकारिणी समिती पुढीलप्रमाणे आहे:

अध्यक्ष : स्वप्नील मोरे
कोषाध्यक्ष : निनाद जाधव
उपकोषाध्यक्ष : दुष्यंत सप्रे
रचनाकार : प्रगती चोपडे
संघटक : मीरा गरुड
सदस्य : स्वप्नील दाभाडे
             दीपाली सोनावणे
             आदित्य हर्डीकर 

नवीन समितीला शुभेच्छा !


धन्यवाद ,

संपदा चंद्रशेखर कोल्हटकर
अध्यक्षा ( २०१३ - १४ )
मराठी मंडळ,
भारतीय विज्ञान संस्था,
बंगळुरू

Thursday, August 28, 2014

गणेशोत्सव २०१४


कार्यक्रमासाठी आग्रहाचे निमंत्रण !

२९ ऑगस्ट (कॅरम हॉल येथे)
'श्रीं'ची प्रतिष्ठापना आणि  अथर्वशीर्ष पाठ - सकाळी ८ वाजता 
आरती व भजनसंध्या - रात्रौ ८. ४५ वाजता

३० ऑगस्ट
आरती - सकाळी ८.३० वाजता ( कॅरम हॉल )सांस्कृतिक कार्यक्रम - सायंकाळी ६ वाजता ( चोक्सी हॉल )
विसर्जन मिरवणूक- रात्री ८. ३० वाजता ATM शेडपासून






- संपदा कोल्हटकर
  मराठी मंडळ

Thursday, August 7, 2014

नवागतांचे स्वागत २०१४


नव्या शैक्षणिक वर्षाची नुकतीच सुरुवात झाली आहे. IISc मध्ये नव्याने दाखल झालेल्या आपल्या मित्र - मैत्रिणींचे दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण मंडळातर्फे स्वागत करणार आहोत . ह्यानिमित्त यंदाचा ' नवागतांचे स्वागत '  हा कार्यक्रम येत्या शनिवारी ९ ऑगस्ट रोजी आयोजित केला आहे. ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला ह्या नवीन मंडळींशी ओळख करून घेता  येईल . 

सर्वांना आग्रहाचे निमंत्रण. 



लांबचा पल्ला गाठताना
दूर दूर जाताना
दु:ख सारी खोडायला 
नवे धागे विणायला 
ठेच लागता सावरायला 
चुकीच्या वाटेवर आवरायला 
आम्ही असू तुझ्याबरोबर नेहेमीच
तुझ्या प्रश्नांची कोडी सोडवायला 

असा मैत्रीचा हात देऊन , IISc मराठी मंडळ
आयोजित करीत आहे ,
" नवागतांचे स्वागत "


दिवस : ९ ऑगस्ट २०१४
वेळ : संध्याकाळी ५.४५ वाजता
स्थळ : Hall above A mess ( A mess च्या वरचे सभागृह )



विनम्र ,
मराठी मंडळ

Thursday, June 5, 2014

निरोप समारंभ २०१४

नमस्कार,

आपण IISc मध्ये येतो अन् पाहता पाहता वर्षे सरतात . दरवर्षी साधारणतः याच वेळी आपल्यापैकी काही जणांची प्रकल्प पूर्ण करायची आणि नव्या क्षितिजांकडे भरारी घेण्याची तयारी सुरु झालेली असते. आणि अचानक निरोपाचा दिवस जवळ येउन ठेपतो .

म्हणूनच आपण IISc मधून पास आउट होणाऱ्या आपल्या मित्र-मैत्रिणींच्या  आठवणी पुनरुज्जीवित करू !
दरवर्षीप्रमाणेच यंदाही मंडळाने निरोप समारंभ आयोजिला आहे . सर्वांनी  कार्यक्रमाला उपस्थित रहावे ही नम्र विनंती.

कार्यक्रमाचा तपशील:
निरोप समारंभ
 
दिनांक- ८ जून,२०१४ रविवार

स्थळ- Hall above A mess

वेळ - संध्याकाळी . ३०


विनम्र , 

मराठी मंडळ

Friday, March 28, 2014

गुढीपाडवा



 गुढीपाडवा 
सस्नेह निमंत्रण ,




येत्या ३१ मार्च २०१४  रोजी नवीन वर्षाची ( शके १९३६ ) सुरुवात होत आहे . त्यानिमित्ताने आपण यंदाही दरवर्षीप्रमाणे गुढीपाडवा साजरा करत आहोत .

ह्या निमित्ताने पाहूया 'विक्रम गोखले' दिग्दर्शित गाजलेला मराठी चित्रपट
'आघात'
प्रमुख कलाकार : विक्रम गोखले , मुक्ता बर्वे

दिनांक : ३० मार्च २०१४
स्थळ : CEDT Lecture Hall
वेळ : सायंकाळी ४.०० वाजता
( कृपया वेळेआधी १५ मिनिटे स्थानापन्न व्हावे )

गुढी उभारणे दिनांक : ३१ मार्च २०१४ , जिमखाना , सकाळी ८.३० वा.

आपण ह्या कार्यक्रमांस आवर्जुन उपस्थित राहावे .

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! 

विनम्र ,
मराठी मंडळ

Saturday, March 15, 2014

एकांकिका गुंफण : Video screening

नमस्कार ,
रंगदक्षिणी एकांकिका स्पर्धेत सादर केलेली मंडळाची सर्वोत्कृष्ट  एकांकिका "गुंफण" अनेकांना प्रत्यक्ष येउन बघत आली नव्हती .  येत्या रविवारी  ह्या एकांकिकेचे video स्क्रीनिंग करण्यात येणार आहे.

एकांकिका : गुंफण
दिनांक : १६ मार्च २०१४ रविवार
स्थळ : management department Seminar Hall
वेळ : दुपारी २. ४५ वा .
सर्वांना आग्रहाचे निमंत्रण,

मराठी मंडळ

हार्दिक अभिनंदन !!

महाराष्ट्र मंडळ बंगळूरू आयोजित महाबँक रंगदक्षिणी एकांकिका स्पर्धा २०१४ मध्ये सुयश संपादन केल्याबद्दल IISc मराठी मंडळाच्या संघाचे आणि प्रोत्साहन देणाऱ्या सर्वांचे मन:पूर्वक   अभिनंदन !!!

सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम पारितोषिक : गुंफण , ( लेखक विनय नारायणे ) सादरकर्ते : मराठी मंडळ, भारतीय विज्ञान संस्था

२६ जानेवारी २०१४ रोजी मराठी मंडळ, भारतीय विज्ञान संस्थेच्या संघाने ' गुंफण ' ही मराठी एकांकिका सादर केली. त्याच दिवशी बक्षिसांची घोषणा करण्यात आली. आपल्या संघाने बऱ्याच  विभागात बक्षिसे पटकावून स्पर्धेमधले आपले वर्चस्व सिद्ध केले. अंतिमत: सर्वोत्कृष्ट एकांकिकेचे पारितोषिक हा तर कळस होता
संघाने मिळवलेल्या बक्षिसांची यादी खालीलप्रमाणे

सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम पारितोषिक : गुंफण

सर्वोत्कृष्ट ध्वनीसंयोजन प्रथम : जयदीप जोशी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री  प्रथम : मधुलिका पाठक
सर्वोत्कृष्ट अभिनेता द्वितीय : तुषार पुंड
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक द्वितीय : विशाल दीक्षित (आणि ऋतुराज सुद्धा )


स्पर्धेत सहभागी संघ पुढीलप्रमाणे :
लेखक : विनय नारायणे
कलाकार : तुषार पुंड , मधुलिका पाठक , नरेंद्र पाटील , ऋतुराज गोवईकर , सुबोध भोसले , अनय देसाई , हेमंत माधेवार
नेपथ्य : मंगलदास गावकर , मयुर बिर्ला , योगेश पालकर , रोहित रोंगे , ईश्वर राउत
ध्वनी संयोजन : जयदीप जोशी
प्रकाश व्यवस्था : गुंजन नारूळकर
आणि
दिग्दर्शक : विशाल दीक्षित ( साहाय्य : ऋतुराज गोवईकर )
याशिवाय
सहाय्य : अदिती देशपांडे , जयेश फडतरे , सुकेश तुम्राम , हर्षवर्धन खरे , सुमेधा कोंडेकर , संपदा
विशेष आभार : विनय नारायणे , प्रमोद खाडिलकर आणि महाराष्ट्र मंडळ , बंगळूरू

ह्या सर्वांचे तसेच इतरही असे अनेक ज्यांनी वेळोवेळी मदत केली , पाठींबा अन् प्रोत्साहन दिले  त्या सर्वांचे आभार आणि पुन:श्च अभिनंदन !!


संघ :

Wednesday, October 2, 2013

हार्दिक अभिनंदन


मराठी मंडळ , भारतीय विज्ञान संस्था या आपल्या संघाने महाराष्ट्र मंडळ बंगलोर येथे गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कमलाबाई मराठे करंडक एकांकिका स्पर्धेमध्ये "मी वरुण अनंत … " या एकांकिकेसाठी

'सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका पारितोषिक'
 
मिळवल्याबद्दल सहभागी संघ आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या तसेच वेळोवेळी अडचणीला धावून येउन मदत करणाऱ्या सर्व सदस्यांचे हार्दिक अभिनंदन !

१७ सप्टेंबर २०१३ रोजी मराठी मंडळ, भारतीय विज्ञान संस्थेच्या संघाने  ' मी वरुण अनंत…  ' ही मराठी एकांकिका सादर केली. १८ सप्टेंबर २०१० रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी बक्षिसांची घोषणा करण्यात आली. आपल्या संघाने अनेक बक्षिसे तर मिळवलीच परंतु मुख्य म्हणजे परीक्षक आणि प्रेक्षकांची मनेही जिंकली
संघाने मिळवलेल्या बक्षिसांची यादी खालीलप्रमाणे -

उकृष्ट अभिनेत्री द्वितीय -  - मधुलिका पाठक , मराठी मंडळ, भारतीय विज्ञान संस्था
उत्कृष्ट अभिनेता द्वितीय  - नरेंद्र पाटील , मराठी मंडळ, भारतीय विज्ञान संस्था
सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका  "मी वरुण अनंत … " (लेखक आणि दिग्दर्शक  -  ऋतुराज गोवईकर ), सादरकर्ते - मराठी मंडळ, भारतीय विज्ञान संस्था

याशिवाय या एकांकिकेत सहभागी सर्वाचे अन ती यशस्वी होण्यासाठी झटलेल्यांचे पुनश्च मन:पूर्वक अभिनंदन ! 

नवीन कार्यकारिणी समिती (2013-14)

नमस्कार मंडळी,
२०१३-१४ सालासाठीची कार्यकारिणी समिती पुढीलप्रमाणे आहे:
अध्यक्षा - संपदा कोल्हटकर 
उपाध्यक्ष - सुबोध भोसले
कोषाध्यक्ष - अनय देसाई
समिती सदस्य:
लोहित कृष्णन्
मधुलिका पाठक
मंगलदास गावकर
मयूर बिर्ला  
5 गणेश घालमे 
6 ईश्वर राऊत
7 नरेंद्र पाटील
8 निक्की कांबळे
9 रोहित् रोंगे
10 श्रद्धा ठाकुर 
11 तुषार पुंड
12 योगेश पालकर 

हार्दिक अभिनंदन आणि पुढील कार्यक्रमांसाठी शुभेच्छा!

Wednesday, October 31, 2012

कोजागरीसाठी आपणां सर्वांना आग्रहाचे निमंत्रण !!!!
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::



शरदाच्या पुनवेला, असा चंदेरी बहर..    

      नभी किरणे घेऊन..उभा रात्रीचा प्रहर..!!     

        सारी इडा पिडा टळो..देश समृद्ध उरावा....      

      गरीबाच्या घरी स्पर्श, परिसाचा व्हावा....


आपल्या परंपरेप्रमाणे आपण ह्यावर्षीही अश्विन पौर्णिमा किंवा कोजागरी पौर्णिमा साजरी करत आहोत.

ह्या रात्री सगळे एकत्र जमून चंद्राच्या अमृतकिरणांच्या वर्षावात जल्लोष करुयात.

यासाठी तुम्हा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण !!!!


::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
वार आणि दिनांक - शनिवार, ०३/११/२०१२  

स्थळ - SAC

वेळ - रात्री ८.३० वाजता 
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

लोभ आहेच, तो वृद्धिंगत होवो.

आपलेच ,
मराठी मंडळ

Saturday, October 6, 2012

मराठी मंडळ समिती २०१२-२०१३

ह्यावर्षी नियुक्त झालेली समिती खालीलप्रमाणे

अध्यक्ष---------------------------गुंजन नारूळकर
उपाध्यक्ष ------------------------ सुकेश तुम्राम
कोशध्यक्ष ----------------------- जयदीप जोशी
रचनाकार ------------------------ विक्रमपाल सिंह
रचनाकार ------------------------ मधुरा मोहोळे
संस्कृतिक प्रतिनिधी ------------- ऋतूराज गोवईकर
संस्कृतिक प्रतिनिधी ------------- धृति पटवर्धन
संस्कृतिक प्रतिनिधी ------------ अदिती देशपांडे
समिती सदस्य ------------------- प्रीतीश पाटील
समिती सदस्य ------------------- सागर खिंवसरा
समिती सदस्य ------------------- प्राणेश मुद्देबियल
समिती सदस्य ------------------- धनंजय देशमुख
 
हार्दिक अभिनंदन आणि पुढील कार्यक्रमांसाठी शुभेच्छा!

गणेशोत्सव २०१२ - संक्षिप्त वृत्तांत

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्वांचा आवडता उत्सव गणेशोत्सव अतिशय थाटात पार पडला. गणेशोत्सवापूर्वी अनेक कार्यकर्त्यांनी झटून तयारी केली. कार्यक्रमाची सुरुवात गणेश चतुर्थीच्या पूजेने झाली. यंदा पूजा अतिशय निराळ्या प्रकारे झाली. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी संस्थेची पोथी आणण्यात आली होती. तिच्या प्रती सर्व उपस्थितांना वाटण्यात आल्या. मधुर मोहोळे हिने पूजा केली तर अंकुर कुलकर्णीने पौरोहित्य केले. संपूर्ण पूजेतील श्लोक अध्वर्यू (पुरोहित) पाठोपाठ सर्व उपस्थितांनी सुद्धा म्हणले. तसेच पोथीमध्ये प्रत्येक श्लोकाखाली लिहिलेला मराठीतील अर्थ वाचण्यात आला. पूजेत सर्वांना सहभागी होता आल्यामुळे आणि मराठीतून समजावलेल्या अर्थामुळे उपस्थितांना हे वातावरण आवडले. पूजेनंतर आरती आणि प्रसाद वाटप झाले. तसेच त्यानंतर २१ वेळा अथर्वशीर्ष पठण झाले. सजावटीमध्ये गणपतीच्या निरनिराळ्या नावांमधून साकारलेली गणेशाची रेखाचित्रे लक्ष वेधून घेत होती. देखाव्यामध्ये रायगडाची प्रतिकृतीसुद्धा ठेवण्यात आली होती.

दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा आणि विसर्जन मिरवणूक झाली. गणेशोत्सवाची सांगता शनिवारी विविध-गुणदर्शन कार्यक्रमाने झाली. या कार्यक्रमात नवीन आलेल्या सदस्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. कार्यक्रम नृत्य, नाटक, ठसकेबाज लावणी अश्या विविध कलाविष्कारान्मधून रंगत गेला. शेवटी नवीन समितीची घोषणा झाली आणि त्यानंतर उकडीच्या मोदकांसहित सुग्रास जेवणाचा आस्वाद सर्वांनी घेतला.

Sunday, August 12, 2012

संगीत 'मानापमान'

मराठी नाट्य संगीत प्रेमींना सुवर्ण संधी.
कऱ्हाडे मित्र मंडळ  सादर   करीत आहे
संगीत 'मानापमान' .
राहुल देशपांडे, प्रियांका बर्वे आणि इतर प्रसिद्ध कलाकार.
१९ ऑगस्ट , रविवार सकाळी १० वाजता
रवींद्र कलाक्षेत्र, बंगलोर
देणगीदार पास रु. १०००, ७००, ५००, ३००, आणि २००.
संपर्क: आंबेकर--9845883941
रुपाली पाध्ये--9845049808
शरण गुर्जर--9448001351
श्रीकृष्ण जोशी-- 9845641798




आयोजक - कऱ्हाडे मित्र मंडळ (बंगळूरू)

नवागतांचे स्वागत

एका नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली आहे. भरपूर उत्साहाने IISc मध्ये पाऊल ठेवणाऱ्या आपल्या नवीन मराठी मित्रमंडळींचे स्वागत करण्यासाठी आपण सर्व जण दिनांक १२ ऑगस्ट २०१२ रोजी सायंकाळी ६ वाजता SAC मध्ये जमूया व सर्व नवागतांची ओळख करून घेऊया..!!!


दिनांक- १२ ऑगस्ट २०१२ (रविवार)
वेळ- सायंकाळी ६ वाजता
स्थळ- SAC (Student Amenities Center)

Thursday, May 31, 2012

क्रिकेट सामना - अधिक माहिती


वार - रविवार
दिनांक - ३ जून २०१२
स्थळ - फुटबॉल मैदान
वेळ - सकाळी ८ वाजता 

खेळण्यासाठी तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नक्की या

Friday, May 25, 2012

क्रिकेट सामना

निरोप समारंभ २०१२ चा भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही क्रिकेटचा सामना आयोजित करण्यात आला आहे. सामना रविवार दिनांक ३ जून २०१२ रोजी सकाळी होईल. सामन्याची निश्चित वेळ आणि ठिकाण लवकरच सांगितले जाईल. तरी सर्व इच्छुकांनी लवकरात लवकर iiscmarathimandal@gmail.com ह्या इमेल आय.डी ला व्यक्तिगत निरोप धाडून आपला सहभाग नक्की करावा हि विनंती.

निरोप समारंभ

दरवर्षी साधारणतः याच वेळी आपल्यापैकी काही जणांची प्रकल्प पूर्ण करायची आणि नव्या क्षितिजांकडे भरारी घेण्याची तयारी सुरु झालेली असते. या भरारीची कितीही ओढ असली तरी इथल्या आठवणींचे धागे मात्र तसेच टिकून राहिलेले दिसतात.

अर्थातच आपण IISc मधून पास आउट होणाऱ्या आपल्या मित्र-मैत्रिणींबद्दल बोलतोय!! मग चला तर, आपण त्यांच्या आठवणी पुनरुज्जीवित करू!!!
या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा मराठी मंडळ (IISc) तर्फे निरोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हे निमंत्रण सर्वांसाठीच आहे, तरीही पास आउट होणाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून वैयक्तिक निमंत्रण देण्यात येईल. सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे ही नम्र विनंती.


कार्यक्रमाचा तपशील:

स्थळ: चोक्सी हॉल

दिनांक: २ जून २०१२ (शनिवार)

वेळ: सायंकाळी ५:३० वाजता


कार्यक्रमानंतर अल्पोपाहाराची व्यवस्था ATM Shed मध्ये करण्यात येईल. तपशील पुढीलप्रमाणे:

स्थळ: ATM Shed

दिनांक: २ जून २०१२ (शनिवार)

वेळ: रात्रौ ८ वाजता